Posts

Showing posts from August, 2019

जैवविविधता संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी आदर्श प्रस्‍थापित करावा – सुधीर मुनगंटीवार

जैव विविधता तसेच जैविक संसाधानबाबत वैज्ञानिक माहीती नागरिक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वच घटकांना मिळावी या दृष्‍टीने बंगलोरच्‍या, कोलकताच्‍या धर्तीवर चंद्रपूर जिल्‍हयातील विसापुर येथे बॉटनिकल गार्डन तयार करण्‍यात येत आहे. अशाच पध्‍दतीचे  बॉटनिकल गार्डन संपूर्ण राज्‍यात तयार करण्‍यात यावे. यासंबंधिचे प्रस्‍ताव शासनाला प्राप्‍त झाल्‍यास त्‍यावर निश्चितपणे योग्‍य विचार करण्‍यात येईल. नाग‍री क्षेत्रात स्‍थापना झालेल्‍या जैवविविधता व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत राज्‍यासमोर आदर्श प्रस्‍थापित करावा असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दि. 03 जानेवारी रोजी नागपूर येथे महाराष्‍ट्र राज्‍य जैवविविधता मंडळाच्‍या सातव्‍या वर्धापन दिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नागपूरच्‍या महापौर सौ. नंदा जिचकार, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख उमेशकुमार अग्रवाल, जैवविविधता मंडळाचे अध्‍यक्ष डॉ. विलास बर्डेकर, सदस्‍य सचिव श्री. अश्रफ, डॉ. आर. पी. शनवारे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. अधि...